मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७च्या सोमवारी चाचण्या होणार
मुंबई - मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रोंची कामे वेगाने झाली आहेत. या दोन्ही मार्गावरील मेट्रो चाचणी सोमवारी केली जाणार आहे. त्यानंतर शेवटच्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण करून या दोन्ही मेट्रो येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रोच्या आकुर्ली स्थानकावर मेट्रोच्या चाचणी पूर्व कार्यक्रमात व्यक्त केला.या दोन्ही मार्गांवरील मेट्रोची सेवा सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना याचा फायदा होईल. २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवारी दुपारी १२.३० वाजता मेट्रो रेल्वेची चाचणी होणार आहे. मुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. आम्ही अनेक अडथळे पार करत हा टप्पा गाठला आहे, असे मत एमएमआरडीएचे आयुक्त आर ए राजीव यांनी व्यक्त केले.
Last Updated : May 29, 2021, 9:56 AM IST