VIDEO : लहान मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने चिंतेची बाब नाही - महापौर मुरलीधर मोहोळ - महापौर मुरलीधर मोहोळ कोरोनावर प्रतिक्रिया
पुणे - कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यासह पुण्यात देखील तिसरी लाट सुरू झाली असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना देखील सर्वात जास्त धोका असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात लहान मुलांना अधिक आणि वेगाने संसर्ग होत आहे. आधीच्या तुलनेत गेल्या 6 दिवसांत पुण्यात चारपट मुले कोरोनाबधित झाले आहेत. जी मुलं कोरोनाबधित आहेत त्या सागळ्या मुलांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने चिंतेची बाब नाही. त्याचबरोबर तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा सुदैवाने लहान मुलांची आकेडवारी वाढत नाही, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.