74वा स्वातंत्र्यदिन : संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर तिरंगी फुलांनी सजले
आळंदी देवस्थानच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण मंदिर तिरंगा फुलांनी सजवले आहे. माऊलींचा गाभारा, चौखांभी मंडप, सोळखांभी मंडप आकर्षक अशा केशरी, पांढऱ्या झेंडू अष्टरच्या फुलांनी सजवला आहे. त्यामुळे माऊलींच्या मंदिर परिसराला आज स्वातंत्र्यदिनानिमित्र वेगळेच रुप आले. दरम्यान, यंदा कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील सर्वच मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, रोजच्या पूजा या परंपरेनुसार सुरू आहेत.