VIDEO : ५० किलोंहून अधिक वजनाची गोणी उचलण्यास माथाडी कामगारांचा नकार
नवी मुंबई (ठाणे) - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक कांदा-बटाटा बाजारात ५० किलोहून अधिक वजनाच्या मालाची गोणी कामगार उचलणार नाही, अशी भूमिका माथाडी कामगारांनी घेतली आहे. बाजार समितीत ५० किलोहून अधिक वजनाच्या आलेल्या मालाच्या गोण्यांना कामगारांनी हातही लावला नाही. कांदा बटाटा बाजारातील व्यापार ठप्प झाला होता. माथाडी कामगारांना व्यापारी वर्गाकडून अधिक वजन दिल्याने कामगारांमध्ये रोष पसरला आहे. ५० किलोपेक्षा अधिक वजन कामगारांना देऊ नये असा राज्य सरकार कडून जीआर काढला होता. मात्र, व्यापारी वर्गाकडून त्याचे वेळोवेळी उल्लंघन करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा माल भरू नये, असे वेळोवेळी परिपत्रक काढले आहे. मात्र, तरीही शेतकरी वर्गाचे नावं पुढे करून व्यापारी हे ५० किलोपेक्षा अधिक माल भरत असल्याने या ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या मालाविरोधात एकमुखाने बंद पुकारला असल्याचे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी म्हटले. (mathadi worker leader narendra patil)