शाळेत प्रवेश नाकारल्यानंतर वीरपत्नीची उद्विग्न प्रतिक्रिया; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर मिळणार प्रवेश - वीर पत्नी शितल कदम मुलगी प्रवेश
देशासाठी हुतात्मा झाल्यावर राजकीय नेते, कार्यकर्ते सर्व येतात. ते हुतात्म्यांच्या कुटुंबाला सांत्वन करतात. मात्र, पुढे या वीरमरण पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबाचे काय होते याकडे कुणीही लक्ष देत नाही. जिल्ह्यातील एका हुतात्म्याच्या वीरपत्नीला असाच अनुभव आला आहे. मागील दोन वर्षांपासून मुलीला शाळेत प्रवेश मिळावा यासाठी शितल कदम प्रयत्न करत होत्या. मात्र, विविध कारणे देत त्यांना प्रवेश नाकारला जात होता. या कटू अनुभवाने आता ही वीरपत्नी उद्विग्न होऊन माझे पती विनाकारण देशासाठी हुतात्मा झाले, अशी त्यांची भावना झाली आहे.