महाराष्ट्र

maharashtra

विदेशात जपली जाती आहे मराठमोळी संस्कृती

By

Published : May 2, 2021, 9:35 AM IST

Updated : May 2, 2021, 11:16 AM IST

केनियाची राजधानी नैरोबी येथे महाराष्ट्र मंडळ, नैरोबी यांच्या वतीने 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतातून केनियात जमलेले मराठी बांधव गुण्यागोविंदाने एकत्रित येत आपली संस्कृती जपत असल्याचे पाहायला मिळत आहे. खोपोलीतील संदीप दत्तात्रेय पाटणकर हे गेली 15 वर्ष केनियात नोकरी व व्यवसाय निमित्त कार्यरत आहेत. यांच्या कन्या ऋचा व रमा यांनी 1 मे महाराष्ट्र दिनी किल्ल्याविषयी उत्कृष्ट सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली आहेत. आपला इतिहास हा युवा पिढीच्या मनावर कोरण्याचे कार्य करणाऱ्या या महाराष्ट्रीयन मंडळीचे खरंच कौतुक आहे. तर या उपक्रमामधून आम्ही सर्व महाराष्ट्रीय कुटुंब एकत्रित येतो. कामाच्या व्यापातून वेळ काढुन मराठमोळे कार्यक्रम साजरे करतो. आमच्या युवा पिढीला महाराष्ट्रीय सण व संस्कृतीची ओळख रहावी, हा प्रयत्न करत असतो. असे महाराष्ट्र मंडळ नैरोबीचे अध्यक्ष अजय आपटे व सरचिटणीस मुग्धा पाटणकर यांनी सांगितले.
Last Updated : May 2, 2021, 11:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details