मराठी लोकांनाच पडला मराठी भाषा दिनाचा विसर?
मुंबई- विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची आज (२७ फेब्रुवारी) रोजी जयंती. आजचा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, मराठी लोकांनाच मराठी भाषा दिनाचा विसर पडल्याचे काहीसे चित्र पाहायला मिळाले. मुंबईतील काही जणांना आजचा दिवस का साजरा करतो याची कल्पनादेखील नव्हती. मात्र, आम्ही मराठी आहोत आणि मराठी लोकांनी चांगलं काम केले पाहिजे अशी उत्तर काहींनी दिली. तर कुसुमाग्रजांचे पुर्ण नाव काय काय आहे ? हे विचारल्यावर त्या बोर्डवर जाऊन पाहतो आणि सांगतो अशीच काहीशी उत्तरे देण्यात आली. तर काहींनी मराठी माणसांनी एकत्र राहिले पाहिजे, एकजूट दाखवली पाहिजे अशी राजकीय उत्तर देऊन मोकळे झाले. मात्र, समाधान होईल असे काही उत्तर मिळालेच नाही. त्यामुळे मराठी माणसालाच आपल्या भाषेच्या दिवसाचा विसर पडावा यासारखी दुसरी धक्कादायक गोष्ट नाही.
Last Updated : Feb 27, 2021, 8:27 PM IST