मराठी भाषा गौरव दिन : औरंगाबादेतील शाळकरी विद्यार्थी आणि पालकांसोबत 'ईटीव्ही भारत'चा संवाद
औरंगाबाद - शाळकरी किंवा महाविद्यालयातील मुलांना मराठी भाषेतील मूलभूत शब्दांचे अर्थदेखील माहित नाहीत. या मुलांना तसेच पालकांना मराठीत लिहिता, वाचता येते का? त्यांना मराठीतील कोणत्या मूलभूत शब्दांबद्दल माहिती आहे किंवा त्यांना मराठीविषयीची आवड किती आहे? याबद्दल मराठी दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतच्या 'जागर मराठीचा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून औरंगाबाद शहरातील काही विद्यार्थी आणि पालकांसोबत 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. पाहूयात हे विद्यार्थी मराठीबद्दल किती जागृत आहेत ते...