'मराठा आरक्षण' ही आता राज्याची जबाबदारी - छत्रपती संभाजीराजे - संभाजीराजे ताज्या बातम्या
येवला - मराठा आरक्षणावर केंद्राने 102 वी घटना दुरुस्ती केली आणि राज्यांना अधिकार दिले. मात्र, आता राज्याला सामाजिक मागासलेपण सिद्ध करावे लागेल. ते सिद्ध केल्यानंतर अपवादात्मक परिस्तिथी निर्माण करावी लागेल. ही राज्याची जबाबदारी असल्याचे खासदार संभाजी राजे यांनी स्पष्ठ केले. खासदार संभाजी राजे हे मराठवाडा दौऱ्यावर जात असताना आज येवला येथे त्यांचे छावा क्रांती सेना, मराठा क्रांति मोर्चा तसेच रायगड ग्रुपतर्फे येवला विंचूर चौफुली येथे स्वागत करण्यात आले.