ठाण्यात मराठा समाजाचे पिंडदान आंदोलन - ठाणे मराठा समाज आंदोलन
ठाणे - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज ठाण्यात मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने सरकारचा निषेध करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून सरकारचे पिंडदान करत असतानाच ठाणे पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी काहीकाळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर येत ठिय्या मांडला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले.