मुंबईतील प्रवासाने नागरिक हैराण; पाहा काय म्हणतायेत प्रवासी - मुंबई लोकल रेल्वे बातमी
मुंबई - देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आता हळूहळू लॉकडाऊन राज्यात, शहरात शिथिल होत आहे. यामध्ये सर्व सुरू होत असताना, सामन्यांना अजूनही लोकल रेल्वे प्रवासात मुभा मिळालेली नाही. महिलांना लोकलमधून प्रवासासाठी परवानगी देण्यात आली असून, त्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...