महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

भावासाठी केली ऑक्सिजनची तजवीज, पण अन्य रुग्णांची तडफड पाहून 'त्याने' सोडले प्राण - ऑक्सिजन कमतरदा बातमी

By

Published : Apr 21, 2021, 7:33 PM IST

Updated : Apr 22, 2021, 6:04 AM IST

नाशिक - डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची कमरता असताना भावाला ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून बाबू सय्यद यांनी ऑक्सिजन सिलिंडरची तजवीज केली. मात्र, ऑक्सिजन अभावी तडफडणाऱ्या इतर रुग्णांची भयंकर स्थिती पाहून त्यांच्या भावाने जागेवरच प्राण सोडले. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या मोठ्या टाकीमध्ये गळती झाल्याने रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. यात 24 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठा हंबरडा फोडला. निशा शर्मा नामक महिलेची आई या रुग्णालयात उपचार घेत होती. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे माझ्या आईने तडफडत जीव सोडला, असे म्हणत तिने टाहो फोडला.
Last Updated : Apr 22, 2021, 6:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details