अमरावती : पहिल्याच पावसात चिखलदऱ्याच्या भीमकुंडातील मुख्य धबधबा प्रवाहित - अमरावती चिखलदरा धबधबे बातमी
अमरावती - मागील चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मेळघाटच्या चिखलदऱ्यामध्ये धबधबे वाहू लागले आहेत. दरम्यान, भीमकुंडातील मुख्य धबधबा हा आता पहिल्याच पावसात प्रवाहित झाला आहे. शेकडो मीटर उंचीवर असलेल्या या धबधबातील पाणी खाली कोसळत असते. त्यामुळे पर्यटकासाठी हा धबधबा आकर्षणाचा विषय असतो. धबधब्याचे नयनरम्य दृश्य पर्यटक आपल्या नजरेत सामावून ठेवत असतात. विदर्भात मान्सून सक्रिय होऊन तीन दिवसाच झाले असले, तरी चिखलदऱ्यात मात्र अनेकदा मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळेच आता इथले सौंदर्य बहारायला सुरवात झाली आहे.