महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील सीताबर्डी येथील यात्रा रद्द, पहिल्यांदाच शुकशुकाट - अमरावती जिल्हा बातमी
अमरावती - महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या सालबर्डी येथे प्राचीन शिव गुफा आहे. त्यामुळे गेल्या शेकडो वर्षांपासून येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. पण, अमरावती जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा महाशिवरात्रीला भरणारी यात्रा रद्द करण्याची मागणी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेंश नवाल यांनी बैतुल येथील जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. ती मागणी मान्य करत कोरोनामुळे यंदा इतिहासात पहिल्यादा ही यात्रा रद्द झाल्याने आज (दि. 11 मार्च) सालबर्डी येथे शुकशुकाट पाहायला मिळाला.