कामाचा योग्य मोबदला नाही मिळत; महिला एसटी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबितच - एसटी कामगार
कोल्हापूर - महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ५६ वे अधिवेशन कोल्हापूर या ठिकाणी पार पडत आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. या राज्यव्यापी अधिवेशनात हजारोंच्या संख्येने एसटी कामगार सहभागी झाले आहेत. महिलांची उपस्थिती सुद्धा लक्षणीय आहे. अनेक असे प्रश्न आणि समस्या घेऊन महिला एसटी कामगार या अधिवेशनाला उपस्थित राहिल्या आहेत. यासंदर्भातच त्यांच्या अनेक मागण्या आणि प्रश्न जाणून घेतले आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...