राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
मुंबई - राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात दोन बालकांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे, तर या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात सायंकाळच्या सुमारास सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. द्राक्ष, टोमॅटो, गहू, हरभरा, कांद्यासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच नांदेड व हिंगोली जिल्ह्यातही वादळी-वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये फळबागांसह, उन्हाळी ज्वारी, भुईमूग, हळद, केळी व भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकासह पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Last Updated : May 3, 2021, 1:23 PM IST