संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले? - प्रतापराव जाधव
नवी दिल्ली - कोरोना महामारीत संसदेचे दुसरे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी सुरू झाले आहे. आज अधिवेशनचा 15 वा दिवस आहे. विविध मुद्यांवर लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे. आज संसदेत पेगासस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. सकाळापासून पार पडेलल्या कामकाजादरम्यान, महाराष्ट्रातील काही खासदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले.