उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चालवली तीन चाकी ई-रिक्षा, सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ - उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा रिक्षा चालवतात
बारामती - तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर विरोधकांकडून या सरकारला तीन चाकी रिक्षा म्हणून हिनवले गेले. त्याच तीन चाकी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आता एक तीन चाकी रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल घेतली आहे. यावेळी स्वत:उपमुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रीक रिक्षा चालवून पाहिली. शनिवारी (दि. २८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौैरा होता. यावेळी त्यांनी पियाजिओ कंपनीला भेटी दिली. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या इलेक्ट्रीक रिक्षाबाबत माहिती दिली. इलेक्ट्रीक रिक्षा नेमकी चालते कशी, याचे कुतहूल उपमुख्यमंत्र्यांना देखील पडले. यावेळी त्यांनी या रिक्षाच्या इलेक्ट्रीक बॅटरीचे, मायलेजची चौैकशी केली. व स्वत: कंपनीच्या आवारात रिक्षा चालवून पाहिली. या घटनेचा व्हीडीओ देखील व्हायरल झाला आहे. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी इलेक्ट्रीक वाहने सोयीस्कर आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले.