महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२१ : राज्याच्या 'बजेट'मधील घोषणा; जाणून घ्या एका क्लिकवर... - महाराष्ट्र बजेट हायलाइट्स मराठीत
मुंबई - राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचं २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केलं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शेतकरी, महिला, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू यांचा विचार करत आरोग्य, शिक्षण, नगर विकास, पायाभूत सुविधा, क्रीडा यांसाठी अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. पाहा, पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय घोषणांचा 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला खास आढावा....