PM Modi Punjab Rally : पंतप्रधानांनी रॅली रद्द केल्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले "भाजपाने खोटा टाहो..." - भाजपवर नाना पटोलेंची टिका
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना आपला पंजाब दौरा रद्द करावा लागल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ( Nana Patole On Modi Punjab Rally ) प्रतिक्रिया दिली आहे. जे पेरलं तेच उगवून आले आहे. पंतप्रधानांनी जो त्रास शेतकऱ्यांना दिला त्याचे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकांनी टाहो फोडून शेतकऱ्यांचे आणि देशाच्या जनतेची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करू नये. पंजाबच्या घटनेपासून त्यांची उतरती कळा सुरू झाल्याचेही पटोले यांनी यावेळी सांगितले आहे.