नाणार रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे यादृष्टीने प्रयत्न केले जातील - नाना पटोले - नाणार रिफायनरी प्रकल्पावर नाना पटोले
रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे आता लोकांचेही मत झालेले आहे. यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. राजापूरातील तुळसुंदे गावात नाना पटोले आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाणारला नानाच न्याय देऊ शकेल, असेही ते म्हणाले.