मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून महिला दिनाच्या शुभेच्छा! - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्यूज
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. महिलांची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपण जर जबाबदारी घेतली नाही, तर महिला दिनाच्या शुभेच्छा पोकळ ठरतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच महिलांच्या प्रती ऋण व्यक्त करणे हा कर्तव्याचा भाग म्हणून नाही, तर आपण ज्यांच्यामुळे आहोत त्या महिला शक्तीला आपण वंदन करत असतो, असेही ठाकरे म्हणाले.