Weather Update : औरंगाबादेत आतापर्यंतचे निच्चांकी तापमान, पुढील दोन दिवस थंडी वाढणार - औरंगाबाद हवामानांचा अंदाज
औरंगाबाद - शहरात गुरूवार दि. 27 जानेवारी रोजी सकाळी किमान तापमान 7.3 अंश सेल्सिअस एवढे ( Aurangabad Weather Update ) नोंदले गेले. आज पर्यंतचे हे निच्चांकी तापमानाची नोंद असून पुढील काळात थंडी कायम राहणार असून वातावरणातील बदल धोक्याचे संकेत मानले जाऊ शकतात अस मत हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केलं. पाकिस्तान मधून आलेल धूळ वादळ गुजरात द्वारे महाराष्ट्रात येऊन धडकले आणि त्याचा परिणाम औरंगाबादमध्ये देखील दिसून आला. गुरुवारी तापमान घसरले असून पुढील 48 तास हे तापमान घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक परिमंडळात एकूणच हा बदल झालेला आहे. या वर्षी पावसाळा वाढला आणि त्याचा परिणाम हा आता दिसून येतोय. लानिना याचा प्रभाव अजून कायम असून मार्च पर्यंत हिवाळा लांबण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे उन्हाळा देखील कमी होईल आणि याचा परिणाम पिकावर आणि माणसाच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले.