लॉकडाऊन तर लावल पण आमच्या पोटाच काय? - Pune curfew
पुणे - राज्यात पुढील पंधरा दिवस 'ब्रेक द चेन' अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या दुसऱ्याच दिवशी पुणे-नगर महामार्गावरील औद्योगिक वसाहत असलेल्या सणसवाडी येथे लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याची परिस्थिती बघायला मिळात आहे. हातावर पोट असणाऱ्या अनेक कामगारांनी काम शोधण्यासाठी मजूर नाक्यावर मोठया प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. "आमच्या घरातील चूल आम्ही काम केल्याशिवाय पेटत नाही, अश्या वेळी आम्ही जायचं कुठे? असा प्रश्न या कामगारांनी केला आहे. हाताला काम मिळालं तर आमची रात्रीची चूल पेटते, आमचा लॉकडाऊनला विरोध नाही, पण आमच्या पोटाच्या खळग्यांचा तरी सरकारने विचार करावा. कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत, याची आम्हाला जाण असून आम्ही सर्व नियमांचे काटेकोर पालन करु, परंतु पोटासाठी आम्हाला काम करण्याची गरज आहे. परंतु लॉकडाऊन मुळे काम मिळणेही कठीण झाले आहे". अशी व्यथा कामगारांनी व्यक्त केली आहे.