'ब्रेक द चेन' : कडक निर्बंधांनुसार सर्वसामान्यांसाठी लोकल बंद - ठाण्यात सर्वसामान्यांसाठी लोकल बंद
ठाणे - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ओळख पत्र पडताळून रेल्वेची तिकिट देण्यात आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकांत नेहमीपेक्षा कमी गर्दी आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून 'ईटीव्ही भारत'ने आढावा घेतला आहे.