प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाला आकर्षक विद्युत रोषणाई - प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हासत्र न्यायालयाला आकर्षक विद्युत रोषणाई
कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. कोल्हापूरात सुद्धा तयारी पूर्ण झाली असून यावर्षी जिल्हा सत्र न्यायालयाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण न्यायालायाचा परिसर उजळून निघाला आहे. विद्युत रोषणाई पाहण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूरकर गर्दी करत आहेत.