अजमपूर शिवारात ऊभा ट्रासफार्म जळून खाक; अनेक ठिकाणची बत्ती गुल - संगमनेर ट्रासफार्म जळून खाक
अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील पिप्रीं लौकी अजमपूर शिवारात रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शरद आप्पाजी दराडी यांच्या शेतातील ऊभ्या ट्रासफार्मने अचानक पेट घेतला. काही वेळात हा ट्रासफार्म जळून खाक झाला. या ट्रासफार्मच्या अवघ्या दोनशे फुटाच्या अतंरावर डॉ. पप्पू दराडी यांचा १० हजार पक्षी असलेला पोल्ट्री फार्म होता. मात्र, सुदैवाने हा पोल्ट्री फार्म बचावला. ट्रासफार्मरवर २० ते २१ कनेक्शन असून ट्रासफार्म जळाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ओवरलोडिंगमुळे ट्रासफार्मर जळाल्याचा अंदाज वर्तवला जात असला तरी यावेळी कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. तर ट्रासफार्मर जळाल्याने महावितरणचे अदांजे ३ लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.