प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्रालयाच्या इमारतीला विद्युत रोषणाई; पाहा व्हिडिओ... - मंत्रालयाच्या इमारतीला विद्युत रोषणाई
मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रालयाच्या इमारतीला तिरंगाची रोषणाई करण्यात आली आहे. डोळ्याचे पारणे फेडणारे या रोषणाईला मुंबईकरांनी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत असलेल्या ऐतिहासिक वास्तूंवर देखील तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे.