गोरेगावमधील न्यू दिंडोशी म्हाडा परिसरात दिसला बिबट्या - नॅशनल पार्क
मुंबई - गोरेगावजवळच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असल्याने तेथे बिबट्या सर्रास दिसतात. काही दिवसांपूर्वीच गोरेगाव पूर्व न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत इमारत क्रमांक 5 च्या मागील संरक्षक भिंतीवरून ते इन्फिनिटी आयटी पार्कच्या पार्किंग लॉट मध्ये रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान एक बिबट्या नागरिकांना दिसला. या जून महिन्यांतील ही तिसरी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी वारंवार वनविभागाला तक्रारी करून देखील लक्ष दिले जात नाही असा आरोप स्थानिक नागरिकांकडून कऱण्यात येत आहे.