Video - अमरावतीच्या भानखेडा परिसरात वाहन चालकांना बिबट्याचे दर्शन - amravati news update
अमरावती - शहरालगत असलेल्या भानखेडा जंगल परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असतो. या पूर्वीही या मार्गावर अनेक वाहनचालकांना बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यातच आता पुन्हा काही वाहनचालकांना रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या एक बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी वाहन चालकांनी आपले वाहन हे बिबट्याच्या दिशेने वळवून त्याच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. दरम्यान या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने लोकांनी दक्षता पाळण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.