महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

BJP MLAs Suspension Quashes : विधिमंडळ, संसदेला विशेषाधिकार, निकालावर विचार करू : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील निलंबित आमदार प्रतिक्रिया

By

Published : Jan 28, 2022, 3:44 PM IST

अहमदनगर - भाजपच्या बारा आमदारांचे पावसाळी अधिवेशनात झालेले एक वर्षाचे निलंबन ( 12 BJP MLAs Suspended ) आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द ( BJP MLAs Suspension Quashes ) केले. त्यानंतर आता भाजपने राज्य सरकरच्या निलंबनाच्या निर्णयावर टीकेची झोड उडवली ( BJP Criticized MVA Government ) आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरला आलेले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( HM Dilip Walse Patil On Suspended MLA ) यांनी यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. न्यायालयाचा निर्णय अंतिम आहे. निर्णयाची पूर्णप्रत आल्यानंतर त्यावर विधिमंडळ विचार करेल. मात्र विधानमंडळ, संसद यांना विशेष अधिकार आहेत. न्यायालय आणि विधानमंडळाच्या निर्णयात एक रेषा आहे. त्यामुळे न्यायालयाने अशा निर्णयात किती दखल घ्यावी हे महत्वाचे आहे अशी प्रतिक्रिया दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या एका निर्णयात राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी देण्यात आल्याबद्दल वळसे पाटील यांनी निर्णयाचे समर्थन केले. राज्यात द्राक्ष लागवड मोठी आहे, अनेकांनी वायनरी टाकलेल्या आहेत. अशा परस्थितीत एखाद्या सुपरस्टोअरमध्ये छोट्याशा जागेत त्याची विक्रीला परवानगी आहे. किरकोळ किराणा दुकानात अशी विक्री नसेल, असे ते म्हणाले. नागपूर परिसरात अनेक ठिकाणी अश्लील डान्सच्या सुरू असलेल्या प्रकरणात कडक कारवाई दोषींवर केली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अहमदनगर जिल्हा पालकमंत्री पदाबाबत पक्ष निर्णय घेईल याबाबत आपणास माहिती नसल्याचे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details