MLC Election 2021 : बिनविरोध निवड होताच सतेज पाटील समर्थकांचा कोल्हापुरात जल्लोष - काँग्रेस कार्यकर्त्यांचा कोल्हापुरात जल्लोष
कोल्हापूर विधानपरिषद (MLC Election 2021 )निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर कोल्हापूर आणि धुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर कोल्हापुरातून भाजपकडून अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला. त्यामुळे सतेज पाटील यांची विधानपरिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर आता त्यांच्या अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे. डॉल्बीचा ठेका आणि फटाक्यांची आतषबाजीमध्ये समर्थक आनंदोत्सव साजरा करत आहेत. याचा आमच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा..