''शस्त्रसंधीचे पालन करणार नाही!' असे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगायला हवे...' - लष्करप्रमुख बिपिन रावत
पुणे - पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करू नये यासाठी वारंवार बजावण्यात येते, मात्र पाकिस्तान ऐकत नाही. कालही (शनिवार) त्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, ज्यामध्ये आपले दोन जवान मारले गेले. त्यामुळे, नाईलाजाने भारतालादेखील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करावा लागला. भारताने आता इथून पुढे 'आम्हीदेखील शस्त्रसंधीचे पालन करणार नाही' असे पाकिस्तानले ठणकावून सांगितले पाहिजे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर यांनी असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्याशी चर्चा केली आहे, आमचे प्रतिनिधी गजानन शिंदे यांनी...