यंदाही गुढीपाडव्याच्यादिवशी लक्ष्मी रोडवर शुकशुकाट - लक्ष्मी रोड पुणे न्यूज
पुणे - साडे तीन मुहुतांपैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या आजच्या मुहूर्तावरही पुण्यातील लक्ष्मी रोडवर शुकशुकाट पाहायला मिळाला. वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे यंदाही पुण्यात सोने -चांदीचे दुकाने बंद ठेवण्यात आले आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पुणेकर गुढीपाडव्याच्या दिवशी सोनें - चांदीची खरेदी करतात. पण मागच्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणि यावर्षी लावण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे पुण्यातील लक्ष्मी रोडवर शुकशुकाट पाहायला मिळाला. लक्ष्मीरोडवर मोठ्या प्रमाणात सराफ व्यापाऱ्यांची दुकाने आहे. या रोडवर सराफ व्यापाऱ्यांबरोबरच कापड व्यापाऱ्यांचीही दुकानेही मोठ्या संख्येने आहे. गुढीपाडव्याच्यानिमित्ताने पुण्यातील लक्ष्मीरोड येथील घेतलेला हा आढावा.
Last Updated : Apr 13, 2021, 6:22 PM IST