तस्मै श्री गुरवे नमः : 'शिक्षकांमुळे दहावीत गणित सुधारले अन् आयुष्याची गोळाबेरीज जमली' - लातूर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत
लातूर - आयुष्यात गुरुजनांची भूमिका महत्वाची असते. योग्य वेळी मार्गदर्शन आणि होत असलेल्या चुका वेळीच निदर्शनास आणून दिल्याने जीवनात बदल होतो. अगदी त्याप्रमाणेच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याबाबतीत झाले. माध्यमिक शिक्षण घेत असताना इंग्रजी आणि गणित विषय अवघड जात होते. त्यावेळी जयराज आणि मंजुनाथ सर यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे गणित तर सुधारलेच शिवाय आयुष्याची गोळाबेरीजही जमली असल्याचे सांगत आतापर्यंतच्या प्रवासात लाभलेल्या गुरूंना त्यांनी वंदन केले.