लासलगाव बाजार समितीत 10 दिवस बंद असलेले कांदा लिलाव सुरू; प्रति क्विंटल 3251 रुपये मिळाला भाव - Lasalgav onion auction in APMC
येवला ( नाशिक ) - गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव आज पूर्ववत सुरू झाले आहे. दीपावली सणानिमित्त लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद होते. कांद्याला कमाल 3,251, सर्वसाधारण 2,751 व किमान 1000 रुपये मिळाले प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला आहे. केंद्र सरकारने कांदा आयात करू नये, जेणेकरून शेतकऱ्याच्या नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी दिली.