लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय सार्वजनिक वाहनांमधून प्रवासास बंदी; पुण्यात नियमांचा फज्जा - कोरोना लसीचे 2 डोस घेणे अनिवार्य
पुणे - प्रशासनाने कोरोना संदर्भात नियम लागू केले आहे. सरकारी वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी कोरोना लसीचे 2 डोस घेणे अनिवार्य केले आहे. याबाबतची पुण्यात ग्राउंड रियालिटी ईटीव्ही भारतने तपासली आहे. स्वारगेटपासून बसने प्रवास केला असता असे आढळून आले, की बहुतांश प्रवाशांचे दोन डोस झाले नाहीत. काहींनी लसीचा 1 डोस घेतला आहे, तर दुसरा डोससाठी त्यांना थांबावे लागत आहे. तरीही ते सरकारी वाहनांतून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळाले. शिवाय या प्रवाशांनी आम्ही एक डोस घेतला आहे तर आम्ही या बसून प्रवास करावा की नाही? जर प्रवास करण्यास मनाई असेल तर पर्यायी व्यवस्था निर्माण करा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तर बसमधील प्रत्येक व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले की नाही, हे तपासणे कठिण असल्याचे बस वाहकांनी सांगितले आहे.