VIDEO : मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असताना कोसळली दरड; एकाचा मृत्यू, महामार्ग ठप्प - मुंबई गोवा चौपदरीकरण काम
रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्यामुळे ( Landslide on Mumbai Goa highway ) महामार्गावरील वाहतूक गेल्या 3 तासांपासून ठप्प आहे. सध्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. परशुराम घाटात सध्या गेल्या काही दिवसांपासून चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास दरड फोडण्याचे काम सुरू असताना अचानक दरड कोसळली, यामध्ये 2 जेसीबी दरडीखाली गेले, या दुर्घटनेत एका जेसीबी चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. या दुर्घटनेमुळे महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या 3 तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान या दुर्घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. हे काम योग्य पद्धतीने होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.