भारतीय रंग महोत्सवात लाखेच्या बांगड्याची क्रेज - लाख बांगड्या क्रेज
नवी दिल्ली - बांगड्या म्हणजे भारतीय स्त्रीचा शृंगार. बांगड्या म्हणजे भारतीय संस्कृतीचे प्रतिक. फॅशनच्या या काळात प्लास्टिक, काच, लाकडी अशा अनेक प्रकारच्या बांगड्या असतात. आज लाखेपासून बनलेल्या बांगड्यांना इतकी मागणी आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय रंग महोत्सवात खास जयपूरवरुन लाखेच्या बांगड्या बनवणाऱ्या कारागिरांना बोलवण्यात आले होते. भारतीय रंग मोहोत्सवात या लाखेच्या बांगड्यांची क्रेज पाहायला मिळतेय. चला जाणून घेऊयात, या लाखेच्या बांगड्या कशा बनतात?