कृष्णा साखर कारखाना निवडणूक : प्रचार सभेत गर्दी, दोन्ही पॅनेलच्या 5 संयोजकांवर गुन्हा दाखल - प्रचारसभेत गर्दी
कराड मधील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी अनेक प्रचार सभा घेण्यात आल्या. या सभांमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाळवा तालुक्यातल्या कृष्णा कारखान्याच्या दोन्ही पॅनेलच्या 5 संयोजकांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातल्या कराड येथील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात आहे. कारखान्याचे अनेक सभासद मतदार वाळवा तालुक्यातही आहेत. त्यामुळे वाळवा तालुक्यातील अनेक गावात सध्या सत्ताधारी पॅनेलकडून प्रचारसभा घेण्यात येत आहेत. मात्र, बोरगाव, बहे, तांबवे आणि रेठरेहरणाक्ष याठिकाणीसभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे पोलिसांनी कृष्णा कारखान्याच्या दोन्ही गटाच्या 5 संयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.