क्रांती रेडकर यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट - Kranti Redkar meet governor BS Koshyari
मुंबई - समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. नवाब मलिक यांच्याकडून जे आरोप गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहेत, त्यावर या भेटीत चर्चा झाली आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरवर समीर वानखेडे यांचे जातीचे प्रमाणपत्र शेअर केले होते. तसेच समीर वानखेडे यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या लग्नाचे फोटोही शेअर केले होते. तसेच अनेक गंभीर आरोपही मलिक यांनी वानखेडे कुटुंबावर केले होते. हे आरोप वानखेडे कुटुंबीयांनी फेटाळून लावले होते.