महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : आमच्या पोटाला मिळाले पण आमची जनावरे उपाशी; कोल्हापुरातील स्थानिकांच्या वेदना - kolhapur flood 2021 citizens reactions

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Jul 24, 2021, 12:46 PM IST

कोल्हापूर - आमच्या गावाला पुराने वेढा दिला आहे. आम्ही सुरक्षित आहोत. आमच्या पोटाला खायला मिळत आहे. मात्र, पुरात अडकलेल्या आमच्या जनावरांना चार दिवसांपासून चारा नाही ते उपाशी आहेत, अशी आर्त हाक आंबेवाडी गावातील ग्रामस्थांनी दिली आहे. कोल्हापुरात आलेल्या भीषण महापुराचा फटका नदीशेजारी असणाऱ्या प्रयाग, चिखली, आंबेवाडी या गावांना बसला. या दोन्ही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने गावात जवळपास पंधरा ते वीस फुटांपर्यंत पाणी आहे. एनडीआर एफ आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कमिटीकडून गावातील नागरिकांची सुरक्षित स्थळी स्थलांतर झाले आहे. अद्यापही अनेकजन आंबेवाडी या गावात अडकून पडले आहेत. आज ही एनडीआरएफ व जिल्हा आपत्ती विभागाकडून बचाव कार्य सुरू आहे. घटनास्थळी जाऊन याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने थेट आंबेवाडीत जाऊन घेतलेला आढावा.

ABOUT THE AUTHOR

...view details