'उद्धव ठाकरे मुंबई पोलीस खिशात घेऊन फिरतात'; संजय राऊतांच्या व्यंगचित्रावर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया..
एमएमआरडीएमध्ये १७५ कोटींचा घोटाळा होऊन महिना झाला, तरी याप्रकरणी साधी तक्रारही दाखल केली जात नाही. याच एमएमआरडीएचे चेअरमन उद्धव ठाकरे आहेत आणि त्यांच्याच शिवसेनेमधील नेत्याने यात एवढा मोठा घोटाळा केला. त्यामुळे प्रताप सरनाईक असो किंवा कोणी, आम्ही दहा वेळा कारवाई करू. जनतेचा पैसा वाचवण्यासाठी ईडी कारवाई करत आहे आणि नक्कीच प्रताप सरनाईक व इतर घोटाळेबाजांना ते तुरुंगात टाकतील, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली. संजय राऊतांनी ट्विट केलेल्या ईडी आणि सीबीआयबद्दलच्या व्यंगचित्राबाबत ते बोलत होते..
Last Updated : Nov 28, 2020, 2:31 PM IST