ठाकरे कुटुंबाचा अन्वय नाईक यांच्याशी जमीन व्यवहार; किरीट सोमैय्या यांचा गंभीर गौप्यस्फोट - उद्धव ठाकरे अन्वय नाईक संबंध
मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक कुटुंबाशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लवण्यात आले? रश्मी ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?, असा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी ठाकरे कुटुबांवर केला आहे.