Kirit Somaiya Allegations : 12 तारखेचे मोर्चे पूर्वनियोजित होते, सोमैयांचा आरोप - अमरावती हिंसाचार लेटेस्ट न्यूज
अमरावती - राज्यभर १२ तारखेला शुक्रवारी निघालेले मोर्चे हे पूर्वनियोजित नव्हते का, असा सवाल भाजपा नेते किरीट सोमैयां(BJP Leader Kirit Somaiya)नी उपस्थित केला आहे. अमरावतीमध्ये झालेल्या घटनेला (Amravati Violence) ठाकरे सरकार (Mahavikas Aghadi Government) हिंसाचार म्हणत आहे. पण बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी म्हटले असते ठोकून काढा. दोन आठवड्यांपूर्वी अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी ते अमरावतीमध्ये दाखल झाले आहेत. शनी मंदिराची पाहणी ते करणार आहेत. त्यानंतर बारा वाजता पत्रकार परिषदही घेणार आहेत. दरम्यान, ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढत असल्याने आपली अडवणूक होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.