किरीट सोमैयांचा रावण दहनातून महाविकास आघाडीवर निशाणा - kirit somaiya burns effigy of ravan and attacks maha vikas aghadi
मुंबई : विजयादशमीनिमित्त भाजप नेते किरीट सोमैयांनी 'वसुली सरकारच्या घोटाळ्यांचा रावण' अशी प्रतिकृती उभारली होती. याची बातमी पसरताच यावरती महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईवर किरीट सोमैयांनी संताप व्यक्त केला. पाच वाजता या रावणाच दहण करणारच असा इशाराही त्यांनी दिला होता. पोलिसांनी त्यांना नोटीस देखील बजावली होती. मात्र अखेर किरीट सोमैयांनी याचे दहन केले आहे. तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीका देखील केली आहे.