जागतिक मूत्रपिंड दिवस विशेष : भावासाठी बहिणीने दिली स्वतःची 'किडनी' - washim breaking news
वाशिम बहीण-भावाच्या नात्यावर प्रकाश टाकणाऱ्या आपण आजवर अनेक कथा-कादंबऱ्या, नाटिका, चित्रपटाच्या माध्यमातून वाचल्या-ऐकल्या अन् पाहिल्या असतील. अशीच बहीण-भावाच्या नात्यातील पैलू उलगडणारी एक प्रेरणादायी गोष्ट घडली आहे. डॉक्टर असलेल्या भावाला किडनी (मूत्रपिंड) देऊन बहिणीने जीवनदान दिले आहे. भाऊ डॉ. दामोधर काळे आणि बहीण देवकाबाई वानखेडे यांच्या अनोख्या नात्याची ही कहाणी आहे.