महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कार्तिकी वारी : कार्तिकीचा सोहळा। चला जाऊं पाहूं डोळां। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य आरास - Karthiki Yatra

By

Published : Nov 15, 2021, 3:50 AM IST

Updated : Nov 15, 2021, 5:48 AM IST

पंढरपूर - कार्तिकीचा सोहळा। चला जाऊं पाहूं डोळां। आले वैकुंठ जवळां। सन्निध पंढरीये, या संत तुकारामाच्या अभंगाच्या ओळी प्रमाणे, आज पंढरपूर (pandharpur) येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर (Vitthal Rukmini Temple) समितीच्यावतीने कार्तिकी यात्रे (Karthiki Yatra) निमित्त विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या मंदिरात आकर्षक व मनमोहक अशी रंगीबेरंगी फुलाची आरास (beautiful decoration in Vitthal rukmini temple) करण्यात आली आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर अधिकच खुलून दिसत होते. दोन वर्षानंतर कार्तिक यात्रा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाविकांनी पंढरपूर गजबजून गेले आहे. आजची सजावट पुण्याचे भाविक राम जांभुळकर ह्यांच्याकडून करण्यात आली. विठ्ठल व रुक्मिणी मंदिर गाभारा, नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप, रूक्मिणीमाता सभामंडप झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Last Updated : Nov 15, 2021, 5:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details