महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Gorantyal and Khotkar Disputes : मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ; कैलास गोरंट्याल यांचा खोतकरांवर पलटवार - राजेश टोपे यांच्यावर टीका

By

Published : Feb 8, 2022, 4:40 PM IST

जालना : जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीवरून काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Congress MLA Kailash Gorantyal) यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याच सांगत राजेश टोपे यांच्यावर टीका (Criticism of Rajesh Tope) केली आहे. या टिकेवरून शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांची एकेरी भाषा वापरण्याची मूळ संस्कृती आहे. अशा शब्दात कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर पुन्हा काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर पलटवार केला (Kailash Gorantyal counterattack) आहे. खोतकर यांनी आम्हाला आमची संस्कृती शिकवू नये. संदीप कर्णीक पोलीस अधीक्षक असताना खोतकर यांनी स्व.अंकुशराव टोपे आणि राजेश टोपे यांच्यावर हात उगारून अरे का रेची भाषा वापरली होती. त्यामुळे त्यांनी आमची संस्कृती काढू नये. भांडण राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आहे. आम्ही आमचं बघून घेऊ. असं म्हणत हमारे आंगणे मे तुम्हारा क्या काम है? असा सवाल खोतकर यांना केला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details