व्याघ्र प्रकल्प अनलॉक : चिखलदरऱ्यात जंगल सफारीला परवानगी - Jungle safari allowed in Chikhaldara
मेळघाट बरोबरच राज्यभरातील सर्वच व्याघ्र प्रकल्प हे आजपासून अनलॉक होणार आहेत. यामध्ये मेळघाट बरोबरच पेंच व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधेरी प्रकल्प, चंद्रपूर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव नागझिरा प्रकल्पातील पर्यटन सुरू करण्यात व जंगलसफारी सुरू करण्यास वनविभागाने हिरवा झेंडा दाखवल्याने आता वन्यजीव प्रेमी व पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.